ज्योती क्रांती संघटनेच्या वतीने सोलापुरात 'नवरदेवांचा' अनोखा मोर्चा


सोलापूर |

राज्यात अनेक ठिकाणी गर्भलिंग निदान होत आहे, त्यामुळं सामाजिक प्रश्न निर्माण झाले आहेत. सोलापुरातील अनेक मुलांना लग्नासाठी मुलीच मिळत नाहीयेत. गर्भलिंग निदान कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, या मागणीसाठी सोलापुरात ज्योती क्रांती संघटनेतर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं.

यावेळी अनेक तरुणांनी नवरदेवाचा पेहराव करत डोक्याला बाशिंग बांधून आणि अंगात सलवार घालत मोर्चात सहभाग घेतला होता. नवरदेवाची वेशभूषा परिधान करून तरुणांनी घोड्यावर स्वार होत अनोखं आंदोलन केलं. सोलापुरातील हा अनोखा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. यावेळी पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी ज्योती क्रांती संघटनेनं केलीये. या अनोख्या आंदोलनाची चर्चा दिवसभर सोलापुरात रंगलीये.

Post a Comment

0 Comments