मुंबई |
आझमगड रेल्वे स्थानकावर मुंबईहून येणाऱ्या ट्रेनमधून उतरलेल्या प्रेमीयुगुलांमध्ये क्षुल्लक कारणावरुन वाद झाला आणि प्रियकराने आधी मुलीचा गळा धारदार शस्त्राने कापला आणि नंतर लनस्वतःचा गळा चिरून स्वत:ला जखमी केले. ही घटना पाहून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. त्यानंतर स्थानिकांनी रुग्णवाहिका आणि स्थानिक पोलिसांना माहिती दिल्यानंतर जखमींना जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
जखमी तरुणी जहांगंज (आझमगढ जिल्हा) येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर तरुण बिलरियागंज पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी आहे. त्यांच्या मोबाईलवरून माहिती घेऊन नातेवाइकांना याबाबत कळवण्यात आलं असून जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एसपी शैलेंद्र लाल यांनी सांगितलं की, हे प्रेम प्रकरण आहे. धनंजय पासवान (२२ वर्ष) याचे १८ वर्षीय तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. तरुणीचा पाठलाग करून तो तरुण मुंबईला गेला होता. दोघांमध्ये लग्नाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. यानंतर मुलगी मुंबईहून घरी येत असताना आझमगड रेल्वे स्टेशनवर तिचा पाठलाग करत आणि स्टेशनवर तरुणाने धारदार शस्त्राने गळा चिरला, त्यामुळे तरुणीचा मृत्यू झाला. तरूणीची हत्या केल्यानंतर तरूणाने देखील त्याच धारदार शस्त्राने त्याचा गळा चिरला आणि रडू लागला. आजूबाजूचा लोकांनी आणि रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी खळबळ माजली. त्यानंतर रूग्णवाहिका
बोलावून त्याला रुग्णालयात पाठवले. प्रकरणाचे गांभीर्य पाहून डॉक्टरांनी जखमींना मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यास सांगितंल. एसपी यांनी सांगितलं की, या क्रूर घटनेची दखल घेण्यात आली आहे. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.
0 Comments