भीषण अपघातात पाच जण ठार; पोलिसाची घटना स्थळी धावपंढरपूर |

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील देशमुख वस्तीजवळील उजनीच्या 33 नंबर फाट्यामध्ये ट्रॅक्टर जाऊन पलटी झाला. ट्रॅक्टर ट्रॉली तर पूर्ण उलटी झाली होऊन त्यातील काही जण त्याखाली अडकले होते. मयत मध्यप्रदेश येथील मधील कोलकी (ता. वरला जि बडवाणी) येथील आहेत. 

अपघातातील एक महिला सोलापूर येथील सिविल मध्ये  मयत तर करकंब येथील ग्रामीण रुग्णालयात  दोन महिला आणि एक दोन वर्षाची मुलगी व एक मुलगा मयत झाला आहे.  तीन जण जखमी आहेत. घटना घडल्यानंतर ग्रामीण घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक महेश मुंडे, वाहतूक शाखेचे गोरवे, आबा जाधव, श्री. गव्हाणे यांनी तातडीने भेट देऊन मदतकार्य सुरू केले. करकंब पोलिसात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल झाला आहे.

Post a Comment

0 Comments