कुंभारी विजय नगर येथे घरगुती गॅसचा काळाबाजार करणार्‍यांवर वळसंग पोलीसांची कारवाई; 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त


सोलापूर |
 
वळसंग पोलीस ठाणे अंकित घरकुल पोलीस चौकी येथे पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख,सहाय्यक पोलीस फौजदार दासरी,सहाय्यक पोलीस फौजदार रावडे,पोलीस अंमलदार गणेश पाटील व धरेप्पा व्हनमोरे यांना कर्तव्यावर असताना गोपनीय बातमीदारामार्फत दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी विजय नगर येथे चोरून अवैध्यरित्या घरगुती गॅस रिक्षामध्ये भरत असल्याची माहिती मिळाली.माहिती मिळताच विजयनगर चौकातील झेंडा कट्टा पासून दक्षिणेस 100 मीटर अंतरावर एका पत्र्याच्या शेडमध्ये इलेक्ट्रिक वजन काट्यावर घरगुती वापरण्याची गॅसची टाकी उलटी ठेवून इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने रिक्षामध्ये गॅस भरत असताना ४  तीन चाकी ऑटो रिक्षा व २ इलेक्ट्रिक मोटार व दोन वजन काटा आणि 12 घरगुती वापरण्याच्या भारत गॅस कंपनीच्या गॅसच्या टाक्या असे मिळून एकूण 2 लाख 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त 
करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे,अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली अक्कलकोट विभागाचे उपविभागिय पोलीस अधिकारी राजेन्द्रसिंह गौर,वळसंग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले,विडी घरकुल पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख,सहाय्यक फौजदार श्रीनिवास दासरी,सहाय्यक फौजदार अभिजीत रावडे,पोलीस अंमलदार गणेश पाटील,दर्याप्पा होनमोरे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments