दिल्ली पुन्हा क्रूरतेच्या घटनेनं हादरली! तिसरीत शिकणाऱ्या चिमुकलीवर बलात्कार

देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा क्रूरतेच्या घटनेनं हादरलीय. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण दिल्लीतील कालका पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता तिसरीच्या विद्यार्थिनीसोबत लैंगिक शोषणाचं प्रकरण समोर आलंय.

शाळेतील एका सफाई कामगारावर विद्यार्थिनीसोबत हा अघोरी प्रकार घडवल्याचा आरोप करण्यात आलाय. पोलिसांनी आरोपी सफाई कामगाराला अटक केलीय. आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणाची संपूर्ण माहिती समोर आलेली नाहीये.

दिल्लीत याआधीही शाळेतील विद्यार्थिनींसोबत अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. या वर्षी 6 ऑक्टोबरला दिल्लीच्या केंद्रीय विद्यालयात 11 वर्षीय विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला होता. शाळेतील दोन वरिष्ठ  विद्यार्थ्यांवर एका विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचा
आरोप आहे.

आरोप आहे. शाळेच्या स्वच्छतागृहात विद्यार्थिनीवर बलात्कार
पीडितेनं आपल्या जबाबात सांगितलं की, जुलै महिन्यात शाळेतील दोन मुलांनी माझ्यासोबत हा प्रकार घडवून आणला. मी वर्गात जात असताना मुलांची माझ्यासोबत टक्कर झाली आणि यानंतर दोन्ही मुलांनी माझ्यावर अत्याचार सुरू केल्याचं अल्पवयीन पीडितेनं सांगितलं. ‘दोन विद्यार्थ्यांनी मला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोघांनी मला शाळेच्या स्वच्छतागृहात नेलं आणि तिथं माझ्यावर बलात्कार केला. दोन्ही आरोपी मुलं इयत्ता 11 वी-12 वीचे विद्यार्थी आहेत. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी याप्रकरणीशाळेच्या मुख्याध्यापकांना नोटीस बजावली होती.

Post a Comment

0 Comments