विराटच्या त्या पोस्टमुळे चाहत्यांमध्ये खळबळ



यंदाचा टी-२० विश्वचषक भारतीय संघ पटकावेल, अशी आशा चाहत्यांना होती. टीम इंडिया उपांत्य फेरीपर्यंत पोहोचली खरी, परंतु उपांत्य फेरीत उत्कृष्ट खेळी करण्यात भारतीय संघ कमी पडला आणि इंग्लंडविरुद्ध पराभव पत्करावा लागला आणि विश्वचषकातील संघाचे आव्हान संपुष्टात आले. भारतीय कर्णधार रोहित शर्मा, माजी कर्णधार विराट कोहली, यष्टिरक्षक दिनेश कार्तिक आणि फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यांच्यासाठी हा शेवटचा विश्वचषक ठरल्याचे मानले जात आहे.

आता या सर्वांना दोन वर्षांनी होणाऱ्या टी-२० विश्वचषकात क्वचितच संधी मिळेल. दरम्यान, माजी कर्णधार कोहलीने शनिवारी (२६ नोव्हेंबर) एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना एकच धक्का दिला. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळलेल्या इनिंगची आठवण करून देत त्याने एक फोटोही शेअर केला.


याशिवाय आणखी एका यूजरने लिहिले की, 'अशी पोस्ट टाकून तुम्ही मला १० सेकंद घाबरवले. निवृत्तीची बातमी आहे असे वाटले. त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हॅपी रिटायरमेंट किंग' तसेच, आणखी एका युजरने ही पोस्ट मुंबईतील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याशी जोडली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा फोटो शेअर करत त्याने लिहिले की, “विराट कोहली सरांनी आज पोस्ट का केली, तुम्हाला याचा संबंध कळतो आहे का?'

Post a Comment

0 Comments