राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ महाराष्ट्रातील पाच परिचारिकांचा सन्मान


मुंबई |

आरोग्य क्षेत्राचा कणा असणाऱ्या परिचारिकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांच्या हस्ते राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्रातील श्रीमती मनिषा जाधव, श्रीमती राजश्री पाटील, श्रीमती अल्का कोरेकर, श्रीमती अंजली पटवर्धन आणि श्रीमती मीरा धोटे या पाच परिचारिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय पातळीवर महाराष्ट्राची मान उंचावणाऱ्या या पाचही परिचारिका भगिनींचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.

वर्ष २०२१ चा राष्ट्रीय ‘फ्लॅोरेन्स नाइटिंगेल’ पुरस्कार वितरण सोहळा आज राष्ट्रपती भवनात पार पडला. यावेळी राष्ट्रपतींच्या हस्ते ५० पर‍िचारिकांना तसेच परिचारक यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय राज्य आरोग्य तथा कुटुंब कल्याण मंत्री डॉ. भारती पवार उपस्थित होत्या.

Post a Comment

0 Comments