दक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्रीच्या सरपंच शांताबाई व्हटकर यांची पदावरून हकालपट्टी ; विभागीय आयुक्त सौरभ राव यांची कारवाईदक्षिण सोलापूर तालुक्यातील धोत्री गावच्या सरपंच शांताबाई नारायण व्हटकर यांना सरपंच पदावरून काढून टाकण्यात आले आहे.विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही कारवाई केली.सरपंच पदाचा तात्पुरता चार्ज उपसरपंच यांच्याकडे देण्यात आला आहे.

सरपंच शांताबाई व्हटकर यांच्या विरोधात ग्रामस्थ बाळासाहेब ईश्वर नवगिरे व सैफन हाजीमलंग शेख यांनी 11 फेब्रुवारी 2022 रोजी गंभीर अपहार स्वरूपाच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे केल्या होत्या.यावर गटविकास अधिकारी,उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत यांच्या अहवालानुसार धोत्रीचे ग्रामसेवक आय.बी.भोज यांना निलंबित करण्यात आले होते आणि सरपंचावर कारवाईचा प्रस्ताव विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठविण्यात आला होता. 

विभागीय आयुक्त राव यांच्याकडे सुनावणी होऊन सर्व अहवाल पाहता सरपंच व्हटकर यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याने त्यांची सरपंच पदावरून हकालपट्टी केल्याचा आदेश विभागीय आयुक्तांनी 1 नोव्हेंबर 2022 रोजी काढला.

Post a Comment

0 Comments