धाराशिव | तेर -पळसप या रस्त्यावरील अपघातामध्ये धनराज पवार यांचा मृत्यू उस्मानाबाद |
  
दोन गाड्यांची अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला तर तीघे जखमी झाल्याची घटना उस्मानाबाद तालुक्यातील तेर -पळसप या रस्त्यावर ५ नोव्हेंबरला दुपारी घडली.                                   

तेर -पळसप रोडवर  (एम एच 20 जी इ 8998 व गाडी क्रमांक एम एच 11 वाय 5666 ) या क्रमांकाच्या गाड्यांची समोरासमोर धडक लागून धनराज धर्मराज पवार वय 31 वर्षे रा. आळणी हल्ली मुक्काम, उस्मानाबाद यांचा जागीच मृत्यू झाला असून ,निशा श्रीनिवास निरगुडे (वय 30 वर्षे,) नितीन पंडितराव शिरसागर वय 33, स्मिता पंडितराव क्षीरसागर (वय 55 वर्ष )राहणार सर्व औरंगाबाद  येथील आहेत.

ते  गंभीर जखमी झाले असून  त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघात इतका भयानक होता की अपघात झाल्यावर गाडी रस्त्याच्या बाजूच्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली. घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिकांनी अपघातग्रस्त नागरिकांना तेर येथील  ग्रामीण रुग्णालय दाखल केले. पुढील  तपास तेर दुरक्षेत्रचे बिट अंमलदार प्रकाश राठोड हे करत आहेत.

Post a Comment

0 Comments