विजय राऊत यांच्यासह तिघे अटकेत, न्यायालयीन कोठडीत रवानगी


बार्शी |

राष्ट्रवादीचे माजी गटनेते नागेश अक्कलकोटे यांच्यावरील प्राणघातक हल्याप्रकरणी माजी नगरसेवक विजय (नाना) राऊत यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे. तीन तासांच्या कायदेशीर प्रक्रियेनंतर तिघांनाही पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी ८ वर्षानंतर आरोपी स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाले. अक्कलकोटे यांनी न्यायालयाच्या माध्यमातून सातत्याने कायदेशीर लढाई लढली होती. त्यानंतर, आज ही अटक करण्यात आलीअसून आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

नागेश अक्कलकोटे यांच्यावर १ ऑगस्ट २०१४ रोजी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात गु.र.नं. ८४/२०१४ भा.द.वि. १४३, १४७, १४८, ३०७, ३२९, ३२४, ३२३, ५०४, ५०६, १४९ व आर्म अॅक्ट २५ (२) प्रमाणे विजय राऊत, दिपक राऊत, सोन्या हाजगुडे, मुन्ना बोते, डंग्या यादव, दिपक धावारे, रणजित चांदणे, प्रकाश राऊत, विशाल चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी दिपक राऊतच्या अटकपुर्व जामीनावेळी तत्कालीन तपास अधिकारी सालार चाऊस यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमुर्ती मृदुला भाटकर यांनी अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले होते. तसेच  तपासा दरम्यान फिर्यादीने संबंधीत गुन्ह्याची कागदपत्रे मागुनही न दिल्यामुळे माहिती अधिकारान्वये पुणे खंडपिठाच्या आदेशानव्ये माहिती घ्यावी लागली होती, अशी माहिती अक्कलकोटे यांनी दिली. कायदेशीर लढाईनंतर अखेर याप्रकरणी विजय राऊत यांच्यासह तिघांना अटक झाली आहे.

Post a Comment

0 Comments