बार्शी तालुक्यातील 'या' गावचे सरपंच पद रद्द ; बार्शी न्यायालयाचा निर्णय


बार्शी |

निवडणूक अधिकाऱ्याकडे दिलेल्या नॉमिनेशन अर्जात अनेक त्रुटी आढळल्याने बार्शी तालुक्यातील रुई गावच्या सरपंचाचे पद रद्द करण्याचा आदेश दिवाणी न्यायाधीश विजयकर यांनी काढला. 

मौजे रुई, ता. बार्शी येथे फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या जनतेतून थेट ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी निवडणुक झालेली होती. त्या निवडणुकीमध्ये सरपंच म्हणून अजित रंगनाथ भोसले यांची निवड झालेली होती. तेव्हा त्यांची विरोधी उमेदवार औदुंबर सुखदेव भोसले यांनी २०१९ मधील झालेली निवडणुक ही मे. दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, बार्शी यांच्यासमोर ती रद्द व्हावी म्हणून अर्ज दिलेला होता.

त्या अर्जाची संपूर्ण चौकशी होऊन सध्याचे सरपंच अजित रंगनाथ भोसले यांच्या २०१९ सरपंच पदाची निवडणुकीवेळी निवडणुक अधिकाऱ्याकडे जो नॉमिनेशन फॉर्म दिला होता. त्यामध्ये भरीव त्रुटी आढळुन आल्या व त्यामुळे दिवाणी न्यायाधिश विजयकर यांनी मौजे रुई येथील २०१९ साली झालेली निवडणुक रद्दबातल ठरविली व निवडणुक अधिकाऱ्यांना ४ आठवडयाच्या आत नवीन फेर सरपंच पदाची थेट जनतेतून निवडणुक घेण्याची अंतिम आदेश दिले. सदरील अर्जदार औदुंबर सुखदेव भोसले यांचेतर्फे अॅड. दत्तात्रय जगन्नाथ घोडके, तुळजापुर व अॅड. तुषार नेताजी गव्हाणे, बार्शी यांनी कामकाज पाहिले व सध्याचे सरपंच श्री. अजित रंगनाथ भोसले यांचेतर्फे पी.बी. काटमोरे, बार्शी यांनी काम पाहिले.

Post a Comment

0 Comments