धक्कादायक ! कर्जबाजारी महिलेवर अत्याचार करून तिचे 'न्यूड' फोटो काढले



सेल्समनने कर्जबाजारी विवाहित महिलेवर अत्याचार करून तिचे न्यूड फोटो काढून ब्लॅकमेल करीत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली असून, सेल्समनविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिषेक मुन्नालाल गुप्ता (३२, विज्ञाननगर) असे आरोपीचे नाव आहे. किराणा दुकान चालविणाऱ्या संबंधित विवाहित महिलेवर कर्ज होते. गुप्ता याची संबंधित महिलेशी ओळख झाली. त्याने तुझे पूर्ण कर्ज फेडून देतो, असे आमिष दाखवत महिलेशी प्रेमसंबंध प्रस्थापित केले. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला. गुप्ताने तिचे नकळत तिचे न्यूड फोटो काढले व ते व्हायरल करण्याची

धमकी देत तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यानंतर त्याने महिला व तिच्या पतीला अनेकदा मारहाण केली. २०१८पासून हा प्रकार सुरू होता. ९ नोव्हेंबर रोजी गुप्ताने महिला व तिच्या पतीला मारहाण करून तिच्या पर्समधून रोख पंधराशे रुपये चोरले तसेच गळ्यातील चेन हिसकावली. त्यानंतर तिला जीवे मारण्याची धमकी देत गळ्यावरून चाकू फिरविला. प्रसंगावधान राखल्याने महिला बचावली. यानंतर महिलेने हुडकेश्वर पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदविली.

Post a Comment

0 Comments