मुंबई |
दिवाळीनिमित्त पत्रकारांना भेटवस्तू दिल्या जातात ,हे सर्वांनाच माहिती आहे.परंतु यावर्षीच्या दिवाळीत महाराष्ट्रातील एका बड्या मंत्र्याने ५०- ५० हजाराची गिफ्ट कार्ड भेट दिल्यामुळे चर्चेचे गुऱ्हाळ सुरु झाले. तीच चर्चा व्हायरल झाल्याने राजकीय वर्तुळातही चर्चा रंगली! या चर्चेला अनेक फाटे फुटत जावून आता ही चर्चा चक्क दिल्ली दरबारात जावून पोहोचली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वास्तविक हे भेटवस्तू देणारे मंत्री फोटो वगैरे काढू नका,असे म्हणत होते, पण काहींनी फोटो काढलेच! त्या फोटोत एका नामांकित कंपन्यांच्या गिफ्ट व्हाउचर्सचेही फोटो निघाले. त्यात २० हजारांच्या दोन आणि १० हजारच्या एका कार्डचा समावेश होता. विशेष म्हणजे दिवाळी गिफ्ट घेण्यासाठी म्हणे तिथे पत्रकारांची रांगही लागली होती. पण काही पत्रकारांची नावे यादीतून गायब झाल्यामुळे एकच गोंधळ उडाला.किस्सा इथेच संपला नाही.
तर हे गिफ्ट प्रकरण आयकर आकारणी नियमांप्रमाणे पोहोचले. कारण आयकर नियम त्यानुसार एका वर्षात एखाद्या व्यक्तीला भेटवस्तू त्यांच्यावर संपूर्ण सवलत आहे. पण एका वर्षात भेटवस्तूंचे मूल्य ५०,००० रुपयांपेक्षा जास्त नसावे पाहिजे. जर एकत्रितपणे मिळालेल्या भेटवस्तूंचे मूल्य ५० असेल १००० रुपयांपेक्षा जास्त असल्यास त्यावर कोणतीही सूट दिली जाणार नाही. आणि आयकर आकारला जाईल. तर हे पत्रकार या भेटीवर करही भरावा लागू शकतो, असेही बोलले जाते.दिल्लीतही तशीच चर्चा रंगत आहे.
0 Comments