'सुगंधी दिवाळी आनंदी दिवाळी' या संकल्पनेतून जनआधार फाऊंडेशनकडून सुगंधी उठणे वाटप



सोलापूर |

दिपावलीचा आनंद द्विगुणीत व्हावा, या उद्देशाने जनआधार फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आनंद गोसकी यांच्या कल्पकतेतून 'सुगंधी दिवाळी आनंदी दिवाळी' या उपक्रमाच्या माध्यमातून सोलापूर महानगरपालिका प्रभाग क्रमांक १५ मध्ये भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. १५ आणि आनंद गोसकी यांच्या जनआधार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षा प्रमाणे परिसरातील नागरिकांना रविवारी, २३ ऑक्टोबर रोजी सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात आले.

पूर्वीचा जूना प्रभाग क्र. ०८ नव्या प्रभाग रचनेनुसार नविन प्रभाग क्र. १५ म्हणून ओळखला जातो, ज्यात प्रामुख्याने साखर पेठ परिसर येतो. या परिसरातील नागरिकांची हर्ष उल्हासाची तेजोमय दिवाळी सुगंधी करण्याच्या भावनेतून भारतीय जनता पार्टी आणि जनआधार फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आनंद मधुकर गोसकी यांच्या पुढाकाराने नागरिकांना दरवर्षी सुगंधी उटण्याचे वाटप करण्यात येते.  

सुगंधी उटणे हा अगरू (ऊद), चंदन, कस्तुरी, केशर इत्यादी सुगंधी पदार्थापासून केलेले एक मिश्रण असते. हा अंगास लावून शरीर/चेहरा स्वच्छ होऊन कांती उजळते. नागरीकांना उटणे वापरण्याची माहिती देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.  नागरिकांनी गोसकी यांना ही आर्शिवादरूपी  दिपावली अभिष्टचिंतन केले. 

यावेळी जनआधार फाऊंडेशनचे महेश दासी, शाम कोटा, ऋषिकेश चिलवेरी, शुभम मिठ्ठा, हर्षित गोसकी यांनी घरोघरी जाऊन सुगंधी उठणे वाटप केले. नागरीकांची कोणतीही समस्या असल्यास आनंद गोसकी यांना संपर्क करण्याचं आवाहनही  नागरिकांना याप्रसंगी करण्यात आले.

Post a Comment

0 Comments