सेवा पंधरवडा अंतर्गत शासकीय योजना जनजागृती व स्वच्छता अभियान


परंडा/प्रतिनिधी |

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जंयती निमित्त सेवा पंधरवडा आयोजन महा.एन.जी.ओ फेडरेशन महाराष्ट्र  च्या वतीने महाराष्ट्रात ७२ ठिकाणी सेवा उपक्रम अंतर्गत प्राथमिक आरोग्य तपासणी,शासकीय विविध योजनांची जनजागृती आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये कपिलापुरी येथे श्रीमंतराजे प्रतिष्ठाण कपिलापुरी व ग्राम पंचायत कार्यालय कपिलापुरी यांच्या वतीने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमा पूजन  करण्यात आले. यानिमित्ताने ग्रामसेवक राठोड यांनी शासकीय योजनांची माहिती  ग्रामस्थांना दिली.शासनाकडुन राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती व अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याचे देखील ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच वैभव आवणे यांनी सांगितले.

त्याच बरोबर उत्तम आरोग्य विषयावर चर्चा  करण्यात आली.सेवा पंधरवडा अंतर्गत स्वच्छता अभियान राबविण्यात आले व नागरिकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. याप्रसंगी ग्रामसेवक राठोड,सरपंच वैभव आवाने,उपसरपंच विलास भोसले,संगणक परिचारक नितीन शिंदे,रणजीत जैन ,शिवाजी पाटील,संतोष डाके,ग्रा.क.बाहुबली मसलकर,श्रीमंतराजे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रणजीत महादेव पाटील व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments