वैराग |
बार्शी तालुक्यातील हत्तीज येथे एका 35 वर्षीय तरुणाने शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना 3 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता घडली असून मयताचे वडील विलास भिका सावंत यांनी वैराग पोलिसात माहिती दिल्याने गुन्ह्याची नोंद झाली आहे .
हत्तीज येथील विलास सावंत यांना दोन मुले आहेत. ती गेली सुमारे वीस वर्षापासून कुटुंबासह विभक्त राहतात . मयत शहाजी याचा एकमुडी स्वभाव असल्याने तो यापूर्वी वारंवार आत्महत्या करण्याचे विचार बोलून दाखवत होता. मयत शहाजी तीन ऑक्टोबर रोजी सकाळी गावातील दूध डेरीवर दूध वाढून गाय शेतात घेऊन गेला होता. दरम्यान त्याने गावातील भागवत कुलकर्णी यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे गावातील संतोष गांडुळे यांनी सांगितल्याचे मयताच्या वडीलांनी सांगीतले आहे.
0 Comments