एक लाख रुपयांची रक्कम निमित्त ठरली;पण त्याचा खून अनैतिक संबंधातून झाल्याची नोंदतामिळनाडूच्या कामगाराचा सोलापुरात खून

सोलापूर |

सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत  वैकाटूचामी उर्फ कल्याणी काटराजा देवर(वय 31 वर्ष,रा,सध्या रा सुनील नगर,एमआयडीसी,मूळ गाव,मदुराई तामिळनाडू ) याचा 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कोयत्याने मारहाण करून खून झाल्याची नोंद एमआयडीसी पोलीस ठाण्यात झाली आहे.अनैतिक संबंधांतून खून झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे.परंतु नातेवाईकांनी माहिती देताना सांगितले की,एक लाख रुपये उसने दिले होते हे उधारी मागताना मारहाण झाली आणि खून झाला असे मृताच्या भावाने सांगितले.याबाबत कामाची देवर,शिवा देवर,महेश देवर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंद झाला आहे.तामिळनाडू येथील युवकाचा सोलापुरात खून झाल्याने एकच खळबळ उडाली आहे,पोलीस प्रशासन कसून तपासणी करत संशयीत आरोपीना ताब्यात घेण्याचे कामकाज करत आहे.

नातेवाईक म्हणतात पैशांच्या कारणावरून खून झाला -
वैकाटूचामी उर्फ कल्याणी काटराजा देवर हे आपल्या भाऊ आई सोबत सोलापुरात व्यवसायासाठी आले होते.त्यांच्या नातेवाईकांतील तामिळनाडू येथील इतर नातेवाईक सोलापुरातील एमआयडीसी सुनील नगर येथे  पापड विक्रीचा व्यवसाय करत आहेत.साधारणपणे दोन वर्षांपूर्वी मयत वैकाटूचामी उर्फ कल्याणी देवर यांनी आरोपीना एक लाख रुपये उसने म्हणून दिले होते.त्याचा तगादा लावल्याने 16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास कामाची देवर,शिवा देवर,महेश देवर यांनी कोयत्याने डोक्यावर ,चेहऱ्यावर मारहाण केली.याबाबत जखमी अवस्थेत राजेश देवर यांनी  कल्याणी देवर याला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.उपचार सुरू असताना कल्याणी याचा मृत्यु झाला.

पोलीस ठाण्यात अनैतिक संबंधातून खून झाल्याची नोंद-
एमआयडीसी पोलीस ठाणे येथून प्राप्त झालेल्या माहितीनुसार कल्याणी देवर यांचा खून अनैतिक संबंधातून झाला आहे.कामाची देवर यांनी या संशयातून कल्याणी देवर यांस  16 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास लाथाबुक्क्यांनी मारहाण कोयत्याने डोळ्याजवळ वार केले,तसेच पायावर देखील वार केले.याबाबत राजेश देवर यांनी तशी फिर्याद दिली आहे.पोलीस उपनिरीक्षक  वळसंगे याबाबत अधिक तपास करत आहेत.

Post a Comment

0 Comments