पीएफआय विरोधात भाजपकडून निदर्शने करत पुतळा दहन;भाजप आमदार विजयकुमार देशमुखा दिली होती धमकी



सोलापूर |

भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयकडून धमकी पत्र आल्याने सोलापुरात भाजप आक्रमक झाली आहे.शनिवारी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी शहरातील मध्यवर्ती भागात टिळक चौक येथे निदर्शने केली आहेत.तसेच पीएफआयचा पुतळा दहन केला आहे.टिळक चौकाच्या मध्यभागी हे आंदोलन झाल्याने तीन पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दाखल होऊन कुणाच्या हद्दीत झाले आंदोलन याबाबत चर्चा करत होते.

भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांना धमकीचे पत्र-
भारतीय जनता पार्टीचे आमदार विजयकुमार देशमुख यांना पीएफआयकडून जीवे मारण्याची धमकी पत्र मिळाले आहे.यामुळे सोलापुरात एकच खळबळ उडाली आहे,पोलीस प्रशासन याचा तपास करत चांगलेच कामाला लागले आहे.भारतीय जनता पार्टीव्हे कार्यकर्ते आक्रमक झाले असून टिळक चौक येथे पीएफआयचा पुतळा दहन करून निदर्शने केली आहे.



Post a Comment

0 Comments