सोलापूर| हरणा नदीत वाहुन गेलेल्या शेतकर्‍याचा मृतदेह अखेर सापडला



सोलापूर |

दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील हरणा नदीत शेतकरी शुक्रवारी सायंकाळी वाहून गेला होता.त्याचा मृतदेह आज रविवारी अथक शोधानंतर सापडला.गेल्या जुलै महिन्यात एका युवकाचा याच नदीत वाहून गेल्याने मृत्यू झाला होता.त्यानंतरची ही दुसरी घटना आहे.

शिवानंद शरणप्पा वाले (वय वर्षे५६) रा.मुस्ती, ता.द.सोलापूर असे वाहून गेलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.शिवानंद वाले हे आपल्या शेतावरून घरी येत होते.शुक्रवारी रात्री आठ वाजता वाजता हरणा नदी पात्रातून येताना पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने ते वाहून गेले.याची माहिती मिळाल्यानंतर शनिवारी सकाळपासून दिवसभर ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला.नदीपात्रात जास्त पाणी असल्याने ते मिळून आले नाहीत.अखेर आज त्यांचा मृतदेह सापडला.

अशा दुर्घटना घडू नये म्हणून मुस्ती ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले होते.अनेक वर्षापासून हरणा नदीवर पूल बांधण्याची मागणी प्रशासनाने गांभीर्याने घेतले नाही. बेघर वस्तीला जोडणाऱ्या या रस्त्यावरील नदीवर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.पूल बांधण्याचा प्रश्न सरकारी दप्तरी अद्यापही रखडलेलाच आहे.येथे लवकरात लवकर पूल बांधण्याची मागणी मुस्तीचे सरपंच नागराज पाटील यांच्यासह सर्व ग्रामस्थांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments