सोलापुरात भाजपच्या ' या ' आमदाराला जीवे ठार मारण्याची धमकी



सोलापूर |

सोलापूरचे माजी पालकमंत्री तथा शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांना जीवे ठार मारण्याची धमकी एका पत्राद्वारे देण्यात आली आहे.

आमदार देशमुख यांना दिनांक ४ ऑक्टोबर २०२२ रोजी हे पत्र आले आहे. शफी नावाच्या व्यक्तीने या पत्रात असे लिहिले आहे की मी पी एफ आय या संघटनेचा कार्यकर्ता आहे. तसेच पत्रामध्ये गलिच्छ भाषेत लिखाण करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली आहे. यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांचे स्वीय सहाय्यक उमेश कोळेकर यांनी पोलीस आयुक्तांना हे पत्र दिले आहे. 

तसेच याबाबत तातडीने सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. पोलीस आयुक्तांनी पत्राची दखल घेत त्याचा तपास करण्याचे आदेश एटीएस व गुन्हे शाखेला दिले आहेत. पत्र नेमके कोणी पाठवले याचा तपास सुरू आहे. तर या प्रकरणाचा तपास करणारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांनी आमचा तपास सुरू असून लवकरच याचा छडा लावला जाईल असे माध्यमांना सांगितले.

Post a Comment

0 Comments