‘हिंमत असेल तर…’; उदयनराजे भोसले अन् शिवेंद्रराजे भोसलेंमध्ये जोरदार खडाजंगीसध्या निवडणुकीवरून अनेक राजकीय नेत्यांमध्ये टीकेचे वातावरण पाहायला मिळते. यामध्येच आता सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजप खासदार उदयनराजे भोसले  आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यामध्ये चांगलीच खडाजंगी झाली.

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातील वाकयुद्ध पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. साताऱ्यात हे दोन्ही राजे पुन्हा एकदा आमनेसामने आले. मिशीला पीळ आणि ताव मारून काहीही होत नसतं, असा टोला उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना लगावला. सातारा विकास आघाडीच्या सर्वच्या सर्व ५० जागा जिंकणार, असा दावादेखील उदयनराजेंनी केला. तर नगरपालिका निवडणुकीत उदयनराजेंचा कडेलोट होणार, असा दावा शिवेंद्रराजे यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments