सोलापूर ! प्रेमी युगुलाचा एकाच दोरीने गळफास; बाय-बाय स्टेटस ठेवत जीवन यात्रा संपवली



सोलापूर/प्रतिनिधी:

प्रेमात सारं काही माफ असतं तुमचं आमचं प्रेम सेम असतं असं जरी म्हटलं तरी आपलं प्रेम जगाला मान्य होणार नाही म्हणून प्रेमी युगुलानी जीवन यात्रा संपवण्याची धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बिबीदारफळ येथे घडली आहे. आमचं प्रेम समाजाला मान्य नाही अशी चिठ्ठी लिहून प्रेमीयुगलांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ या गावात घडली. यामुळे सोलापूर जिल्हा हादरला आहे.

बीबीदारफळ येथील गणेश विद्यालयात मागील वर्षीच इयत्ता १२ वी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या प्रांजली भारत सुतार व विवाहित असलेल्या वाजिद चाँद इनामदार यांनी राहत्या घरात एका दोरीने गळफास घेतला. मयत मुलीच्या मामाने या घटनेची खबर पोलिसात दिली होती.

सोलापूर तालुका पोलीस ठाण्याला मिळाली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मृतदेह खाली उतरविले त्यानंतर शवविच्छेदनासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले.

दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी पूर्वी दोघांनीही स्वतंत्र दोन चिठ्ठ्या लिहिल्या आहेत, त्या चिठ्ठ्या पोलिसांच्या हाती लागल्या असून आमचं प्रेम समाजाला मान्य नाही. आमच्या आत्महत्येला कोणासही जबाबदार धरू नये असा मजकूर चिठ्ठीत लिहिल्याचे पोलिसांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments