करमाळा | तळीराम ग्रामसेवकाचा ग्रामपंचायत कार्यालयामध्ये राडा ; महिला सरपंच म्हणतात अनेक वेळा तक्रार केली पण कोण दखलच घेईना


करमाळा |

करमाळा तालुक्यातील मौजे रामवाडी येथे ग्रामसेवकाने ग्रामपंचायत कार्यालयात दारूच्या नशेत राडा घातल्याचा प्रकार घडला असून ग्रामस्थांमध्ये खळबळ उडाली आहे. त्याच्यावर विस्तार अधिका-याच्या साक्षीने पंचनामा करून कारवाई करण्यात येत असल्याचे वृत्त आहे. रामवाडी ग्रामपंचायत कार्यालयात एक महिला संगणक परिचारिका व त्या ठिकाणी सरपंच देखील महिला आहे.

अशा वेळी ग्रामसेवक एस. एम. इंगळे हे अति मद्यपान करूनच डुलत डुलत कार्यालयात आले. त्यांना निट उभे राहता येत नसल्याने त्यांने चक्क कार्यालयात दफ्तरासह लोटागंण घातले. यावेळी सरपंच मनिषा कावळे हे कार्यालयात आले असता ग्रामसेवक त्यांना नशेमध्ये तल्लीन दिसले. तो नशेमध्ये तल्लीन होऊन बरळत असल्याने त्याची भाषा कळत नव्हती असे सरपंच मनिषा कावळे यांनी सांगितले.

शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ग्रामसेवक एस. एम. इंगळे यांनी मद्य प्राशन करून कार्यालयात प्रवेश केला होता. यावेळी अधिक मद्य पिल्याने चक्क कार्यालयात लोटागंण घातलेचे सर्वत्र कळताच ग्रामस्थही मोठ्या संख्येने जमा झाले.

त्यामुळे संबंधित घडलेल्या प्रकारची माहीती गटविकास अधिकारीना दिली त्या नंतर त्यांनी लगेच विस्तार अधिकारी मनोजकुमार म्हेत्रे यांना त्या ठिकाणी पाठवले. यावेळी वरिष्ठ अधिकारी आल्याचे देखिल त्यांना भान नव्हते.

विस्तार अधिकारी मनोजकुमार म्हेत्रे यांनी संबंधी ठिकाणी नागरिकासह ग्रामसेवकाचा पंचनामा केला आहे. त्यांच्याशीही उद्धट वर्तन ग्रामसेवक इंगळे यांनी केले. त्यामुळे त्यांची तपासणी करण्यात आली व पंचनामा करण्यात आला. यावेळी जिंती आरोग्य उपकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बि.एल.गाढवे, सरपंच मनिषा कावळे, आरोग्य सेवक जि.एस. नलवडे, संगणक परिचारिका एस.एस.शिर्के,अनिल शिर्के, आर.यु. शिर्के, संजय शिर्के,तुकाराम झुबंर, वारगड पोलिस पाटील आदि जण उपस्थित होते.

यापूर्वी संगणक परिचारिका व सरपंच मनिषा कावळे यांनी
ग्रामसेवकाच्या मद्यपान करून कार्यालयात येणे व कामकाजाची टाळाटाळ करणेबाबत गटविकासाधिकारी कडे तक्रार केली होती. परंतु त्यांच्या वरती आद्यापपर्यंत कारवाई मात्र काहीच झालेली नव्हती. दरम्यान संबंधित तळीराम ग्रामसेवका वरती गुन्हा दाखल करून निलंबित न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पंचायत समिती समोर आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गौरव झांजूर्णे यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments