टाटा समूहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ते गुजरातवरून मुंबईच्या दिशेने येत असतांना चोरोटी येथे त्यांच्या गाडीचा अपघाच झाला आहे. याबाबतची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून याबाबतची अधिकृत माहिती पालघर पोलिस अधिक्षकांनी दिली आहे.
सायरस मिस्त्री हे गुजरातकडून मुंबईच्या दिशेने येत होते. ते पालघरमधील डहाणू तालूक्यातील चारोटी या गावातील चारोटी नाक्यावर त्यांची चारचाकी दुभाजकाला धडकली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. सायरस मिस्त्री यांची २०१९ साली टाटा समूहाच्या प्रमुखपदी निवड करण्यात आली होती.
0 Comments