सुर्डी येथील महावितरणच्या कार्यालयातून सव्वा लाख किमतीच्या इलेक्ट्रिकल सामानाची चोरीबार्शी |

बार्शी तालुक्यातील सुरडी येथील महावितरण च्या कार्यालयातून कपरकाईल नावाच्या इलेक्ट्रिकल सामानाची चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे, या घटनेची फिर्याद आश्विन दीपक उळे (वय २८) कनिष्ठ अभियंता यांनी बार्शी तालुका परिसरात दिली आहे. 

सविस्तर वृत्त असे की, सुरडी येथील महावितरणच्या आवारातील जुने व नादुरुस्त असलेले पावर ट्रान्सफर वरील चिनीमातेचे इन्सुलटर खाली व प्लेट बाजूला सरकलेली दिसली अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता अंदाजे १५०० किलो वजनाची कपर कईल तार चोरीला गेल्याचे समजले. त्याची किंमत अंदाजे सव्वा लाख रुपये आहे, कनिष्ठ अभियंता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अध्यात चोरट्याविरुद्ध भादवी कलम 379 नुसार बार्शी तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments