सोलापूर : कुंटणखान्यावर छापा;चार एजंट अटकेत, दोन पीडितांची सुटक


होटगी रस्त्यावरील मोहितेनगरच्या पाठीमागे असलेल्या भीमा विकास ऑफिससमोर उच्चभ्रू वस्तीतील एका घरात चालणाऱ्या कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने छापा टाकून दोन पीडितांची सुटका केली तर चार एजंटाना अटक करण्यात आली आहे.

बेकायदेशीरपणे कुंटणखाना चालू असल्याची माहिती मिळाल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस पथकाने मोहितेनगर पाठीमागील भीमा विकास ऑफिसच्यासमोरील घरात बोगस गिऱ्हाईक पाठवून खात्री करून दुपारी दीडच्या त्या ठिकाणी छापा टाकला. यातील संशयित महिला आरोपी रेखा शिवाजी काळे (वय ४५, रा. अपना बझारच्यामागे, विजापूर रस्ता), आकाश महादेव सावंत (वय २५), अभिजित गोपाळ घाडगे (वय २८, दोघे रा. मोहितेनगरच्यामागे, भीमा विकास ऑफिससमोर) हे एजंट घरमालक हिराबाई महादेव सावंत (वय ६६) हे पीडित चौघे दोन महिलांची पिळवणूक करुन त्यांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्या कमाईवर स्वतःची उपजीविका करीत असताना मिळून आले. 

या चौघा आरोपीविरुध्द विजापूर नाका पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त राजेंद्र माने, उपायुक्त बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजयालक्ष्मी कुर्री, पोलीस अंमलदार राजेंद्र बंडगर, अ. सत्तार पटेल, महादेव बंडगर, मुजावर, मंडलिक, उषा माळगे यांनी केली..

Post a Comment

0 Comments