राज्यभर प्रसिद्ध असणारे येरमाळा जवळील मलकापूरचे स्वयंघोषित राष्ट्रसंत एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर विनयभंगचा गुन्हा २८ जुलै २०२२ रोजी दाखल करण्यात आला होता त्यांना कळंब पोलिसांनी ४५ दिवसानंतर अटक केली आहे. गुन्हा नोंद झाल्यापासून लोमटे महाराज हे फरार होते.
पीडित महिला मलकापूर येथील मठात दर्शनासाठी गेली असता महाराजांनी विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित महिलेला प्रसादाच्या पेढ्यातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केला असून त्याची क्लिप माझ्याकडे असल्याचे धमकावत विनयभंग केल्याचा पीडित महिलेचा आरोप आहे. महिलेच्या तक्रारीवरून येरमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments