बार्शीतील बस स्थानकावर दागिने चोरी करणाऱ्या महिलाचे आंतरराष्ट्रीय टोळी जेरबंद ; दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शी शहर पोलिसांनी दमदार कामगिरी करत पण राज्यातील महिला टोळीत जेरबंद करून त्यांच्याकडून सुमारे दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. सात सप्टेंबर रोजी बार्शी बस स्थानकातून चार तोळे सोन्याचे दागिने व रोग रक्कम पर्स मधून लंपास केल्याची फिर्याद शहर पोलिसात दाखल करण्यात आली होती. सदर फिर्यादी प्रियंका अंकुश थाटे (वय २७) रा. ईडा अंतगांव ता. भुम, जि. उस्मानाबाद यांनी दिली होती.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, फिर्यादी हा बार्शी येथून मिरज येथे जाणे करीता औरंगाबाद ईचलकरंजी बस मध्ये चढत असताना अज्ञात इसमाने त्यांचे जवळ असलेले सोन्याचे दागिणे व रोख रक्कम असा एकुण २ लाख ५ हजाराचा रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याबाबत बार्शी शहर पोलीस ठाणे येथे तक्रार दिल्याने ती बार्शी शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ५९७/२०२२ भादवि. कलम ३७९ प्रमाणे दाखल आहे.

  सदर गुन्हयाचा तपास करित असताना यातील फिर्यादीचे सोने व पैसे हे तीन महिलानी चोरल्याचे निष्पन्न झाले त्या नंतर त्यांचा तात्रीक पध्दतीने तपास केला असता सदरच्या महिला हया बार्शी सोलापूर बसने सोलापूर कडे गेल्याचे निष्पन्न झाल्याने लागलीच त्यांचा पाठलाग करून त्यांना नान्नज ता. उत्तर सोलापूर येथून ताब्यात घेवून त्यांची महिला पोलीस अंमलदार करवी अंग झडती घेतली असता महिला पद्मीनी अनंत सकट वय-५० वर्षे, रहाणार धक्का तांडा शहाबाद ता.चितापूर जि. गुलबर्गा राज्य कर्नाटक हिचे अंगझडतीमध्ये १,८०,०००/- रू चे चार तोळयाचे सोन्याचे पट्टीचे गंठण व २२,५००/-रु. चे पाच ग्रॉम वजनाचे कानातील सोन्याचे दागिणे तसेच महिला नुरी रंजित उपाडे वय - ४० वर्षे रा. सदर, हिची अंग झडतीमध्ये चोरीस गेलेली रोख रक्कम २,५००/-रु. असा दोन लाख पाच हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 

पद्मीनी अनंत सकट, नुरी रंजित उपाडे, नर्मदाबाई नेरू उपादे उर्फ माधुरी जॅकी पाटील वय-३५ वर्षे, रा.धक्का तांडा शहाबाद ता.चितापूर जि.गुलबर्गा राज्य कर्नाटक यांना सदर गुन्हयात अटक करून मा. न्यायालया समक्ष हजर केले असता त्यांची दिनांक १० सप्टेंबर रोजी पर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे.
    
सदरची कामगीरी ही पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामिण तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामिण हिंमत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी बार्शी विभाग जालिंदर नालकुल, पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण शाखेतील सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार, सहाय्यक पोलिस फौजदार अजित वरपे, अरूण माळी, सिंधु देशमुख, वैभव ठेंगल, मनिष पवार, संगाप्पा मुळे, रवी लगदिवे, सचिन देशमुख, ज्ञानेश्वर घोंगडे, अर्जुन गोसावी, अविनाश पवार यांनी केली आहे. पोलिसांच्या या कामागिरीमुळे बार्शी शहरामध्ये पोलिसांचे कौतुक केले जात आहे.

Post a Comment

0 Comments