कोल्हापूर हादरलं! WhatsApp स्टेटस ठेवत 19 वर्षीय मुलाची आत्महत्या


 
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असणाऱ्या दत्तवाड गावातील एका तरूणाने  आत्महत्या केली आहे.  आपल्या दत्तवाड (ता. शिरोळ) येथील राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. सिद्धार्थ सुभाष जाधव (वय 19 ) या महाविद्यालयीन तरुणाने बुधवारी रात्री दोनच्या सुमारास व्हॉटस्अॅपवर स्टेटस ठेवला आणि त्यानंतर आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेने दत्तवाड गावात अचानक खळबळ माजली होती. दरम्यान त्याने का आत्महत्या केली हे कारण समोर येऊ शकले नाही.

सिद्धार्थने मलिकवाड रोड दत्तवाड येथील आपल्या घरासमोरील आंब्याच्या झाडाला बुधवारी मध्यरात्री गळफास लावून घेतला. सिद्धार्थ  बारावी उत्तीर्ण असून पुढील शिक्षण घेत आहे. त्याच्या मागे आई, वडील व बहीण असा परिवार आहे. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. कुरुंदवाड पोलिस तपास करीत आहेत. कोणत्या कारणावरून आत्महत्या केली हे समजले नसल्याने गावात चर्चेला उधाण आले होते.

ही घटना आज सकाळी उघडकीस येताच कुरुंदवाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. याबाबतचा तपास बीट अंमलदार अनिल चव्हाण करीत आहेत.

Post a Comment

0 Comments