खराब झालेल्या राष्ट्रध्वजाची सन्माननीने विल्हेवाट कशी लावावी.?? वाचा ध्वज संहिता


भारतीय ध्वज संहिता, 2002 नुसार, राष्ट्रध्वजाची सन्मानाने विल्हेवाट लावण्याचे दोन मार्ग आहेत - जाळणे किंवा दफन करणे. यातील कोणतीही प्रक्रिया निवडतानाही कठोर नियम पाळले पाहिजेत. ध्वज दफन करण्यासाठी, सर्व खराब झालेले ध्वज लाकडी पेटीत गोळा करा. त्यांना फोल्ड करा आणि व्यवस्थित ठेवा. पेटी जमिनीत पुरून टाका. झेंडे दफन झाल्यावर क्षणभर शांतता पाळा. दुसरा पर्याय म्हणजे ध्वज जाळणे. यासाठी सुरक्षित ठिकाण निवडा आणि ते स्वच्छ करा. झेंड्यांची घडी घाला. लाकडांच्या मध्यभागी झेंडे काळजीपूर्वक ठेवा आणि नंतरच आग लावा. ध्वज न बांधता जाळणे किंवा आधी ध्वज जाळणे आणि नंतर लाकडांवर टाकणे हा गुन्हा आहे. राष्ट्रध्वज हे अभिमानाचे प्रतिक असून त्याची विल्हेवाट लावताना त्याचा योग्य सन्मान राखला गेला पाहिजे, याची नोंद घ्यावी. गृह मंत्रालयाने सर्वांना आवाहन केले आहे की, प्लास्टिकपासून बनवलेल्या भारताच्या राष्ट्रध्वजाचा वापर टाळावा.

Post a Comment

0 Comments