ग्रीन झोन मधील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणी नगर अभियंत्याच्या विभागीय चौकशीचे आदेश - नागेश अक्कलकोटे


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शीतील बेकायदेशीर गुंठेवारी प्रकरणी चौकशीत दोषी असलेल्या नगर अभियंता भारत विधाते यांच्या विभागीय चौकशीचे आदेश आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन यांनी दिल्याची माहिती माजी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी दिली आहे. यामुळे बार्शीतील बेकायदेशर गुंठेवारी चा पर्दाफाश झाला आहे .

अक्कलकोटे पुढे बोलताना म्हणाले की , बार्शी नगरपरिषद मध्ये 2017 पासून बेकायदेशीर बनावट गुंठेवारी ची प्रकरणे सुरू होती . याबाबत वारंवार तक्रारी केल्या नंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात आली. यामध्ये नगररचना विभागा चा अहवाल मागविण्यात आला होता. त्यामध्ये सदर गुंठेवारी बेकायदेशिर रित्या करण्यात आलेली आहे. नियमबाह्य बेकायदेशिर रित्या गुंठेवारी करण्यात आल्याचा ठपका ठेवण्यात आला होता .

अक्कलकोटे पुढे बोलताना म्हणाले की ,नगरपरिषद संचलानालयाने दिलेल्या पत्रात ,भारत अंबऋषी विधाते, नगरअभियंता/नगररचनाकार, बार्शी नगरपरिषद जिल्हा सोलापूर यांच्याविरूध्द ठेवण्यात आलेले दोषारोपाचे सविस्तर विवरण असे की भारत अंबऋषी विधाते, नगर अभियंता/नगररचनाकार, बार्शी नगरपरिषद जिल्हा सोलापूर हे दिनांक ०७/१२/२०१८ पासून  या पदावर कार्यतर असताना त्यांनी त्यांचे कर्तव्यात खालील प्रमाणे कसून केली आहे. महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमन, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम २००१ मधील कलम ३ (क) नुसार दि.०१.०१.२००१ नंतर पाडण्यात आलेले व हस्तांतरित करण्यात आलेले भूखंड गुंठेवारी विकास नियमाधीन करण्याकरिता पात्र असणार नाहीत असे स्पष्ट नमूद असतानाही नगर परिषद बार्शीने गट क्रमांक ११६/१ मधील भूखंड क्र. ३५ पैकी वा ३६,३४ व ३५ पैकी मधील गुंठेवारी नियमितीकरण केले असल्याचे दिसून येत आहे. बार्शी नगर परिषदेची हि कृती कायद्याशी सुसंगत नाही असा स्पष्ट अभिप्राय सहसंचालक नगररचना यांनी दिला आहे. श्री. भारत अंबऋषी विधाते नगर अभियंता/नगररचनाकार नगरपरिषद बार्शी यांनी त्यांच्या कर्तव्यात हलगर्जीपणा व दुर्लक्ष केल्याने सदर प्रकरणी अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे.श्री. भारत अंबऋषी विधाते, नगरअभियंता/नगररचनाकार, बार्शी नगरपरिषद जिल्हा सोलापूर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ चे कलम ३ (२) (३) अटरा नुसार जे कोणत्याही कायद्याच्या, नियमाच्या, विनियमाच्या आणि प्रस्थापित प्रथेच्या विरूध्द आहे किंवा असू शकते असे कोणतेही कृत्य करण्यापासून दूर राहील; आणि कलम ३(२)(३) एकोणीस नुसार त्याचे कर्तव्य पार पाडताना शिस्त राखील आणि त्याला याथोचितरित्या कळविण्यात आलेल्या कायदेशीर आदेशाचे पालन करण्यास जबाबदार असले; या तरतुदीचे उल्लंघन केले आहे. . भारत अंबऋषी विधाते, नगरअभियंता/नगररचनाकार, बार्शी नगरपरिषद जिल्हा सोलापूर यांनी कर्तव्यात कसूर, हलगर्जीपणा व दुर्लक्ष केल्याने सदर प्रकरणी अनियमितता झाल्याचे दिसून येत आहे. सबब महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ कलम ४ नुसार कार्यवाही करणे आवश्यक आहे. विधाते, नगरअभियंता/नगररचनाकार, बार्शी नगरपरिषद जिल्हा सोलापूर यांनी गैरवर्तन केले असून त्याकरिता श्री. विधाते हे जबाबदार असून त्यानी महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७९ मधील नियम ३ नुसार गैरवर्तन केले आहे. असे स्पष्ट म्हटले आहे .

त्या खर्चाचे काय ? 
सदर गुंठेवारी रद्द करण्याची कार्यवाही मुख्याधिकारी यांच्या कडून सुरू आहे मात्र या नियमबाह्य गुंठेवारी झालेल्या भागात नगरपालिकेचे लाखो रुपये खर्चून करण्यात आलेली काँक्रिट रस्ते गटार लाईट याची जबाबदारी कोणाची असा ही सवाल अक्कलकोटे यांनी उपस्थित केला आहे . आणि यापुढे या खर्चाची जबाबदारी नीचीत करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

बेकायदेशीर खरेदीखत रद्द होणार.
बेकायदेशररित्या ग्रीन झोन मधील गुंठेवारी रद्दबातल ठरली असल्यामुळे त्या गटातील झालेल्या खरेदीखत देखील रद्द होणार असल्याचे अक्कलकोटे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments