धक्कादायक! हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब खाडे विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल


बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील हनुमानगड  येथील मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या विरोधात लग्नाचे आमिष दाखवून बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले बद्दल गुन्हा दाखल पीडित महिलेने हा गुन्हा दाखल केला आहे. 
    
 सदर महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, बुवासाहेब जिजाबा खाडे रा. सावरगाव घाट हनुमान गड, ता. पाटोदा जि.बीड याने जून ते २०२२ ते दिनांक १२ /७ /२०२२  रोजी रात्री १२:०० च्या सुमारास फिर्यादी महिला यांना सोन्याच्या दागिन्याचे तसेच लग्न करण्याचे आमिष दाखवून फिर्यादी महिलेच संमतीशिवाय यातील बुवासाहेब जिजाबा खाडे याने वेळोवेळी बळजबरीने शारीरिक संबंध ठेवले. वगैरे मजकूरचे फिर्यादीवरून आरोपी बुवासाहेब खाडे विरोधात भा. द. वि. कलम. 376 (N),506  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हा काल दि. ४ आॅगस्ट २०२२ रोजी रात्री ११ : : ३० वा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास खर्डा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील हे करत आहेत.

दरम्यान   मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांनाही आपल्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ५ जणांविरोधात जामखेड तालुक्यातील खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . सोन्याची चेन , अंगठ्या , मणी असा १३ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांच्या फिर्यादीवरून बाजीराव गीते , भिवा गोपाळघरे , अरुण गीते , राहुल संपत गीते , रामा गीते ( सर्व रा . मोहरी , ता . जामखेड ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 
      
 हे मठाधिपती बुवासाहेब खाडे हे शुक्रवारी ( २ ९ जुलै ) मोहरी ( ता. जामखेड ) येथे महादेव मंदिराचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी बाजीराव गीते. भिवा गोपाळघरे अरुण गीते, राहुल संपत गीते, रामा गीते यांनी मठाधिपती खाडे यांना मोहरीतील घुगे वस्ती येथील बाजीराव गीते यांच्या घरामध्ये बोलावून घेतले. रात्री दीडच्या सुमारास राहुल संपत गीते याने मोबाईलमधील फोटो दाखवून शिवीगाळ, दमदाटी करत मठाधिपती खाडे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

 यावेळी राहुल गीते याने दोरी घेऊन खाडे यांना फाशी देईन, असे धमकावले. त्यानंतर पहाटे साडेपाच वाजता राहुल गीते याने कोयता घेऊन व बाजीराव गीते याने खाडे यांना जीवे मारण्याची धमकी देऊन सोन्याचे दागिने काढून घेतले, असे फिर्यादीत म्हटले आहे. मठाधिपती खाडे यांच्यावर अहमदनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत . याही गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक प्रकाश पाटील करत आहेत.                    

Post a Comment

0 Comments