सोलापूर ! दहा हजाराची लाच घेताना तलाठी चतुर्भुजसोलापूर/प्रतिनिधी:

दिवसेंदिवस लाचखोरीचे प्रमाण वाढत जात आहे, लाचखोरीच्या दररोज नव्या नवनव्या घटना उघडकीस येत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील एका तलाठ्याला लाच घेताना रंगेहात पकडले आहे. शेतीच्या सातबारावर एकाचे नाव कमी करून खरेदीदार यांचे नाव लावण्यासाठी दहा हजाराची लाच घेणाऱ्या तलाठ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले.

गणेश हणमंत कदम वय ४८ पद तलाठी, मुळ नेमणुक सज्जा गरोळगी, अति, कार्यभार सज्जा- मिरजगी तहसिल कार्यालय, अक्कलकोट ता. अक्कलकोट जि.सोलापूर असे लाच घेताना अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

Post a Comment

0 Comments