बार्शी! जनावरांच्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराचे होणार संगणकीकरण; राज्यातील पहिला प्रयोग


बार्शी/प्रतिनिधी:

बार्शीतील लातूर रोड व वैराग बाजार समितीत जनावराच्या बाजारात एकूण 4 कोटी 45 लाख रुपये खर्चून नव्याने जनावर निवारा शेड उभा करून अद्यावत सोयी सुविधा देत पशुपालकाची फसवणूक टाळण्यासाठी पारदर्शी व्यवहारासाठी खरेदी विक्रीच्या सर्व नोंदी आता संगणीकृत होणार असून बाजार समितीच्या सभेत या विषयास मंजुरी मिळाली आहे येत्या काही दिवसात याची सुरुवात होणार आहे येथे होणाऱ्या सर्व जनावरे खरेदी विक्रीचे संगणकीकरण करण्यात आले असून राज्यातील पहिला प्रयोग ठरणार असल्याची माहिती चेअरमन रणवीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 यावेळी सभेस व्हाईस चेअरमन झुंबर जाधव, संचालक रावसाहेब मनगिरे, शिवाजी गायकवाड, वासुदेव गायकवाड, बापूसाहेब शेळके, सचिन जगझाप, पिंटू घोडके, शालन गोडसे, प्रभावती काळे, अण्णासाहेब कोंढारे, चंद्रकांत मांजरे, अभिमन्यू डमरे, अरुण येळे, कुणाल घोलप, साहेबराव देशमुख, बाजार समितीचे सचिव तुकाराम जगदाळे, पर्यवेक्षक मिरगणे  बी एल आदी उपस्थित होते. बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती पार पडलेल्या सभेत लातूर रोड  येथील बाजार समितीच्या जागेत नव्याने तीन कोटी दहा लाख रुपये खर्चून 35 जनावराची निवारा शेड दावण पाणी निचार्‍याची सोय लाईट सुविधा चार ठिकाणी जनावर लोडिंग व्यवस्था तीन पाण्याचे हौद अशा अद्यावत सोयी असणार आहेत, याचे काम अंतिम टप्प्यात असून लवकरच या ठिकाणी जनावर बाजार सुरू होणार आहे. तर वैराग येथील उपबाजार समितीच्या आवारातही एक कोटी ३५ लाख रुपये खर्चून जनावरासाठी पंधरा निवारा शेड दाबून लाईटची सोय सुविधा पाण्याचे तीन हौदआधी सोयी सुविधाचे काम प्रगतीपथावर आहे, या जनावराच्या बाजारात खरेदी विक्रीसाठी आलेल्या शेतकरी  व पशुपालकाची फसवणूक होऊ नये यासाठी बाजारात येणारे बैल गाय म्हैस रेडा घोडा शेळ्या मेंढ्या या सर्व जातीच्या जनावराच्या व्यवहारानंतर घेणार देणार मालक याचे फोटो सहीत व जनावराचे फोटो त्याचे वर्णन किंमत अशा संपूर्ण होणाऱ्या व्यवहाराची नोंद संगणकावर होणार आहे ही योजना बार्शी व वैराग या दोन्ही बाजार समिती सुरू होणार आहे, यामुळे पशुपालकाची होणारी फसवणूक थांबणार आहे. यासाठी बाजार समितीने संगणक प्रशिक्षक कर्मचाऱ्यांच्या व्यवस्था केली आहे तर यामुळे बाजार समितीची आर्थिक उलाढाल व उत्पन्न वाढणार आहे तसेच लवकरच लातूर रोड येथे बाजार समिती जागेत जनावराचे प्रदर्शन भरवले जाणार आहे. तसेच बाजार समितीच्या वतीने जनावराचे लसीकरण आजारावर तज्ञ पशु चिकिस्ताच्या भेटी दूध उत्पादन वाढीसाठी पशु तज्ञाची व पशुपालन शेतकऱ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन पशुधन वाढीसाठी पशुपालकांना संबंधित बँकांकडून अर्थसाहयासाठी बाजार समिती प्रयत्न करणार असे विविध उपक्रम कृषी उत्पन्न बाजार समिती राबवणार असल्याचे चेअरमन रणवीर राऊत यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments