बार्शी! गावतलाव भरला ; उपाय योजनेसाठी आमदार व मुख्याधिकारी घटनास्थळी


बार्शी/प्रतिनिधी:

मंगळवार दिनांक २ ऑगस्ट २०२२ रोजी बार्शी मंडल मधील बार्शी शहर व ग्रामीण भागात ८३.५ मिली मीटर पाऊसाची नोंद झालेली आहे. या मुसळधार पावसामुळे बार्शी शहर हद्दीतील ओढे-नाल्यांना पूर आला होता. 

या पावसामुळे बार्शी शहरातील सुभाष नगर भागातील गणेश तलाव ( गांव तळे ) पूर्णपणे भरला असून, त्याचा सांडवा सोडला आहे. मुसळधार पावसामुळे बार्शी शहरातील सखल भागात पाणी साचले होते. 

आज आमदार राजेंद्र राऊत यांनी गणेश तलावाची ( गांव तळे ) पाहणी करून तेथील परिस्थिती व सांडव्याच्या पाण्याची माहिती घेतली. यावेळी मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील , माजी उपनगराध्यक्ष नवनाथ चांदणे, बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे, माजी नगरसेवक अमोल चव्हाण, किरण तौर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments