सोलापूर ! रेल्वेच्या धडकेत तिघांचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी...


पंढरपूर शहरात पहाटे घडली दुर्घटना 

पंढरपूर : पंढरपूर येथील टाकळी रोड नजीक असलेल्या रेल्वे मार्गावर चार बिहारी मजुरांना रेल्वेची धडक बसल्याची  घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास  दुर्घटना घडली आहे. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला असून गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या एकाला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 


भरधाव वेगाने येणाऱ्या रेल्वे गाडीने त्यांना उडवले असल्याचा अंदाज रेल्वे पोलिसांचा आहे . या घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तात्काळ जखमीला उपचारासाठी हलवले आहे . मृतांचे शवविच्छेदन करण्यात आले असून अद्याप मृत अथवा जखमींची ओळख पटलेली नाही .

Post a Comment

0 Comments