सोलापूर मध्ये कैद्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न


सोलापूर/प्रतिनिधी:

सुनिता कंकणकवाडी (न्यायाधीश), धर्मादाय उपायुक्त सोलापूर विभाग सोलापूर व सोलापूर जिल्हा कारागृह अधीक्षक श्री हरिभाऊ मिंड  यांच्या संयुक्त  मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्ह्यातील धर्मादाय रुग्णालयांच्या वतीने सोलापूर जिल्हा कारागृहातील पुरुष व महिला  कैद्यांसाठी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

           
 दिनांक 16.08.2022 ते 22.08.2022 रोजीपर्यंत एकूण सहा दिवस विविध वैद्यकीय  शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यामध्ये1. अलफैज रुग्णालय सोलापूर यांनी शुगर व बीपी 2.यशोधरा रुग्णालय सोलापूर यांनी मुतखडा व किडनी 3.गांधी नाथा रंगजी रुग्णालय सोलापूर यांनी त्वचारोग4.लायन्स क्लब ऑफ सोलापूर यांनी नेत्रविकार 5.पंडित दीनदयाळ उपाध्याय दंत रुग्णालय केगाव यांनी दंतविकार व 6. अश्विनी ग्रामीण रुग्णालय कुंभारी यांनी सर्दी खोकला व ताप अशा विविध रोगावर तज्ञ वैद्यकीय अधिकारी यांचे मार्फत तपासणी करून औषधे वाटप करण्यात आली. डोळे तपासणी करून डोळ्यांचे नंबर देऊन बांद्याना चष्मे वाटप करण्यात येणार आहेत . तसेच तज्ञ महीला वैद्यकीय अधिकारी यांचेकडून महिला विभागामध्ये शिबिर आयोजित करण्यात आले.
        
जिल्हा कारागृहात धर्मादाय रुग्णालय मार्फत आरोग्य तपासणी शिबिर यशस्वीरित्या पार पडणे करिता धर्मदाय आयुक्तचे इन्स्पेक्टर जावळे साहेब व कारागृहाचे वरिष्ठ तुरुंगाधिकारी श्री भाऊसाहेब आगवणे, तुरुंगाधिकारी श्री  रोहित साळुंखे  व तुरुंगाधिकारी श्री प्रदीप बाबर, नर्सिंग ऑर्डली  खामकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

0 Comments