सोलापूर ! मुळेगाव तांडा येथे कारमधून 3 लाख 48 हजाराची गोवा राज्याची विदेशी दारु जप्त



राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाने दिनांक 5ऑगस्ट शुक्रवारी दुपारच्या  सुमारास दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव तांडा  हद्दीत सापळा रचून फरार  आरोपीच्या ताब्यातून एका इस्टीम कार मध्ये. अवैधरित्या विक्रीच्या उद्देशाने साठवून ठेवलेला गोवा राज्य निर्मित व गोवा राज्यात विक्रीस असलेला 48 पेट्या विदेशी मद्याचा एकूण रुपये 3 लाख 48हजार  किंमतीच्या मद्यसाठ्यासह 5 लाख 53हजार  रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
 
सविस्तर वृत्त असे की, राज्य उत्पादन शुल्क, भरारी पथक सोलापूर दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे  यांनी 5 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास मुळेगाव तांडा येथील स्वामी विवेकानंद नगर (ता. द. सोलापूर) हद्दीत एका चारचाकी इस्टिम कार मध्ये गोवा विदेशी मद्याची वाहतूक होत असल्याच्या मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार सापळा रचला. त्यानुसार चारचाकी इस्टिम कार क्रमांक MH12 CK 8695 या वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित व विक्रीस असलेले विदेशी मद्य अवैध विक्री करीता फरार आरोपीने त्याच्या ताब्यात बाळगून त्याचा साठा केल्याने सदर वाहन वरील ठिकाणी जाऊन ताब्यात घेवून त्याची तपासणी केली असता त्यात  गोवा राज्यात विक्रीस व महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याचे मॅकडॉवेल नंबर वन व्हिस्कीचे 17 बॉक्स, इम्पेरियल बल्यू व्हिस्कीचे 23बॉक्स व रॉयल स्टॅग विस्कीचे 6 बॉक्स असे एकूण 48 बॉक्स व    विविध ब्रँन्डचे एकुण अं.500 लेबल्स आढळून आल्याने सदर वाहन रीतसर जप्त करून फरार  आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलमांतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला. सदर गुन्ह्यात जप्त केलेल्या दारूची किंमत 3लाख 48 हजार रुपये इतकी असून सदर गुन्ह्यात एक चारचाकी वाहन  असा एकूण 5 लाख 53 हजार  रुपये किंमतीचा मुद्देमाल सदर कारवाईत जप्त करण्यात आलेला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्याचे आयुक्त श्री.कांतीलाल उमाप , संचालक (अंमलबजावणी व दक्षता) श्री. सुनिल चव्हाण, विभागीय उपआयुक्त पुणे विभाग श्री.अनिल चासकर यांचे मार्गदर्शनाखाली अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर श्री. नितीन धार्मिक , उपअधीक्षक श्री.आदित्य पवार , निरीक्षक सीमा तपासणी नाका जी. एल. जाधव, दुय्यम निरीक्षक अ 2 विभाग मनीषा मिसाळ, दुय्यम निरीक्षक भरारी पथक सोलापूर सुरेश झगडे, सहायक दुय्यम निरीक्षक मुकेश चव्हाण, जवान कर्मचारी मलंग तांबोळी, चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, प्रकाश सावंत, गजानन ढब्बे, नंदकुमार वेळापूरे, योगीराज तोगी, वाहन चालक मारुती जडगे यांनी केली आहे.
  
आवाहन
           
राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाकडून विशेष पथके नेमण्यात आली असून अवैध दारू / ताडी विक्री, निर्मिती, वाहतूकीवर सातत्याने कारवाया केल्या जात आहेत. तसेच सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारू/ ताडी निर्मिती /वाहतूक /विक्री /साठा, बनावट दारू, परराज्यातील दारू याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा.

Post a Comment

0 Comments