बार्शी! वन विभागाने केली वडाच्या झाडाची पुनर्लागवड


बार्शी नगरपालिकेकडून गटार स्वच्छ करीत असताना जेसीबीच्या सहाय्याने 10 ते 12 फूट उंचीचे वडाचे झाड काढून टाकले गेले होते. याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी बार्शी कार्यालयास मिळताच अधिकारी, कर्मचारी यांनी पाहणी करून वडाच्या झाडाची पुनर्लागवड केली आहे. 

पानगाव येथील शासकीय रोपवाटीका येथे वडाच्या झाडाची पुनर्लागवड करण्यात आली. या मोहिमेसाठी उपवनसंरक्षक धैर्यशिल पाटील, सहाय्यक वनसंरक्षक एल.ए. आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी डी. पी.खलाने, वैरागचे वनपाल इरफान काझी, पानगावचे वनरक्षक महावीर शेळके, श्रीमती ए.बी.सोनके, श्रीमती पी.बी.कोंबडे यांनी झाडीची पुनर्लागवड करून वडाला जीनदान दिले.

Post a Comment

0 Comments