कृणाल पांड्याच्या घरी चिमुकल्याचे आगमनभारतीय संघाचा क्रिकेटपटू कृणाल पांड्या याच्या घरी चिमुकल्याचं आगमन झालं आहे. कृणाल पांड्याने आपण बाबा झाल्याचं सोशल मीडियावरून सांगितलं आहे. कृणालने काल सोशल मिडियावर पोस्ट करत आपला आनंद शेअर केला. त्याने काल त्याच्या इंस्टाग्रामवर एक फोटो टाकला त्यामध्ये त्याच्या पत्नीसह तो त्याच्या मुलासोबत दिसून आला. हार्देिक पांड्याप्रमाणे तोही एका मुलाचा बाबा झाला आहे. त्यामुळे हार्दिक पांड्याही काका झाला आहे.

कृणाल पांड्याने इंस्टाग्रामवर मुलाचा फोटो शेअर करताना मुलाचं नाव देखील जाहीर केलं आहे. त्याने मुलाचं नाव ‘कवीर कृणाल पांड्या’ असं सांगितलं आहे. हे नाव त्याच्या चाहत्यांना देखील आवडले आहे. त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू केला आहे.

Post a Comment

0 Comments