दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती ग्रामस्थांनी मृतदेह ताब्यात घेणार नाही म्हणून सिव्हिल रुग्णालयात ठिय्या मांडून आंदोलन केले.रविवारी हरणा नदीमध्ये मुस्ती येथील शौकत रशीद नदाफ(वय वर्षे ३७) हा इसम पाण्यात वाहून गेला आणि त्याचा मृत्यू झाला,त्या निषेधार्थ नदीवर पूल बांधावे व मृतदेह ताब्यात घेणार नाही म्हणून ग्रामस्थ आक्रमक झाले होते.शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत या सर्व आंदोलकांना उठवून प्रशासनाला निवेदन देण्यास भाग पाडले.
दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती तथा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस भीमाशंकर जमादार यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.मुस्ती या गावापासून १०० मीटर अंतरावर हरणा नदी आहे.मुस्ती वरून अरळीकडे जाण्यासाठी मार्ग नाही.त्यासाठी नदीतून जावे लागते.
नदीवर ब्रिज नसल्याने नदीत बुडून यापुर्वी अनेकांचा मृत्यू झाला आहे.दरम्यान रविवारी शौकत नदाफ हे नदीत अचानक पाणी आल्याने वाहून गेले,सोमवारी त्यांचा मृतदेह सापडला.केवळ नदीवर ब्रिज नसल्याने नदाफ यांचा मृत्यू झाल्याने मुस्ती गावचे नागरिक संतापले.मंगळवारी सकाळी 11 वाजता सिव्हिल रुग्णालयात त्यांनी ठिय्या मांडला.
0 Comments