सोलापूर ! गरीब घरची तू आहेस म्हणत विवाहितेचा छळतू गरीब घरची आहे आम्हाला लग्नात काहीच मानपान केले नाही असे म्हणून सासरच्या लोकांनी विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना उघड झाली. सादीया अजहर सय्यद (वय १९, रा. जुना पुना नाका) असे पिडीत विवाहितेचे नाव आहे. हिचा विवाह अजहर अमीर सय्यद याच्याशी झालेले होते. 

लग्नानंतर काही दिवसानंतर पती अजहर अमीर सय्यद इनयातबी अमीर सय्यद, मासमी अमीर सय्यद, शब्बो अमीर सय्यद, शगुप्ता अमीर सय्यद, तहसीन अमीर सय्यद, चाँदबेगम अमीर सय्यद, शमा अमीर सय्यद (रा. रंजनखेळी, बीदर) यांनी संगनमत करून सादीया हिला तू भिकाऱ्याची मुलगी आहे. असे म्हणून अन्न पाणी न देता शारीरीक व मानसिक छळ केल्याची तक्रार सादीया सय्यद हिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिली.

Post a Comment

0 Comments