अक्कलकोट ! आंतरराज्य मोटारसायकल चोरणारी टोळी उघडकीस


 पोलीस अधिक्षक सातपुते यांनी मोटार सायकल चोरी संदर्भात त्या उघडकिस आणण्याच्या सक्त सुचना जारी केल्या होत्या. त्याप्रमाणे अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, व उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर  यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि.प्रदीप काळे यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन हद्यीमध्ये विविध पथके नेमुन अशा गुन्हेगारांची माहिती काढत असताना दिनांक २१/०७/२०२२ रोजी दुधनी दुरक्षेत्र अंमलदार पो.हे.कॉ./८२४ अजय भोसले, पोना / १५३२ अल्ताफ शेख, पोना/२६८ नबिलाल मियाँवाले हे पोलीस अंमलदार दुधनी दुरक्षेत्र हद्यीमध्ये पेट्रोलिंग करीत असताना एक विना क्रमांकाची मोटारसायकल संशयीत इसम घेउन जात असताना मिळुन आलेने त्यास ताब्यात घेवुन चौकशी केली असता त्याचे नाव रामचंद्र यलप्पा ग्वल्ल वय २४ वर्षे, रा जेउरगी, ता अफझलपूर, राज्य कर्नाटक असे असुन त्याने बाबु जगप्पा ग्वल्ल रा दुधनी ता अक्कलकोट व शाम ग्वल्ल रा गॅस गोडाउनचे पाठीमागे, अक्कलकोट यांचे सहाय्याने सदरची मोटार सायकल हि चोरी केलेचे कबुल केलेने इकडिल पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदर गुन्हयातील अटकेतील आरोपीकडुन अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाणे कडिल गु.र.नं. १७५/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे मधील चोरीस गेलेली मोटार सायकल क MH DL 4062 व गु.र.नं. ४०४/२०२२ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे मधील चोरीस गेलेली विना नंबरची मोटार सायकल असे दोन मोटार सायकली तसेच मौजे येळसंगी, ता अफझलपुर जि. गुलबर्गा, राज्य कर्नाटक येथुन चोरीस गेलेली मोटार सायकल क KA 32 ES 1248 असे एकुण ०३ मोटार सायकली हस्तगत करण्यात आलेले आहेत. सदर गुन्हयातील अटकेतील आरोपी हा आणखी इतर ठिकाणी मोटार सायकली चोरी केलेबाबत कबुली देत असुन त्या उघडकीस आणणे करीता पुढील तपास पो. ना. अल्ताफ शेख करीत आहेत.

सदरची कामगीरी पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधिक्षक हिंमत जाधव, अक्कलकोट उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रसिंह गौर, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदिप काळे, पो.हे. कॉ. अजय भोसले, पो. ना. अल्ताफ शेख, पो.ना. सुभाष दासरे, पो. ना. नबिलाल मियाँवाले, पो.ना. सुरेश लामजणे, पो.कॉ. अजय शिंदे यांनी केली आहे. 

Post a Comment

0 Comments