आमदार तानाजी सावंतांना धक्का, सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून हकालपट्टी


सोलापूर जिल्हा संपर्क पदावरून तानाजी सावंत यांना हटवण्यात आल्याची माहिती आहे. तानाजी सावंत यांच्या जागी अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं करण्यात आली आहे. यामुळे आमदार सावंत तानाजी सावंत यांना शिवसेनेत जबर धक्का दिला असे मानले जाते.

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांच्या गटानं वेगळी वाट पकडल्यानं शिवसेनेत गळतीच सत्र सुरूच आहे. यातच हकालपट्टी देखील शिवसेनेकडून केली जातेय. यातच आता शिवसेनेचे बंडखोर आमदार तानाजी सावंत यांची शिवसेनेच्या सोलापूर जिल्हा संपर्क पदावरुन हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती आहे.  सोलापूर जिल्हा संपर्क पदावर अनिल कोकीळ यांची नियुक्ती करण्यात आल्याचं वृत्त शिवसेनेचे मुख्यपत्र दैनिक ‘सामना’मध्ये देण्यात आलंय. तानाजी सावंत यांची हकालपट्टी आणि अनिल कोकीळ यांची नियुक्ती पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानं करण्यात आल्याची देखील माहिती या वृत्तात देण्यात आली आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांना शिवसेनेचा हा धक्का मानला जातोय.

Post a Comment

0 Comments