चिमुकलीचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे हट्ट, “मलाही गुवाहाटीला न्या”;


मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ‘फोन’वरचं कामकाज सध्या चांगलंच गाजतंय. गल्लीपासून दिल्लीपर्यंत आता त्यांची चर्चा होत आहे. अशातच आता एका चिमुरडीसोबत एकनाथ शिंदेंनी दिलखुलास गप्पा मारल्या आहेत. मात्र तिच्या एका प्रश्नावर खुद्द मुख्यमंत्री शिंदेही निरुत्तर झाले आहेत.

अन्नदा नावाची ही लहान मुलगी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला गेली होती. तिने शिंदेंशी बोलताना सांगितलं, “माझ्या मोठ्या बाबांनी मला टीव्हीवर दाखवलं होतं की तुम्ही कोरोनामध्ये लोकांची खूप मदत केली, पूर आलेला तेव्हा पाण्यात जाऊन मदत केली. मी पण जर अशी मदत केली, तर मलाही मोठं झाल्यावर मुख्यमंत्री होता येईल का?” त्यावर शिंदेंनीही हसून उत्तर दिलं की, नक्की होता येईल. आपण त्यासाठी खास रिझर्वेशन करू.

ही चिमुरडी पुढे म्हणाली, पूर्वी मला फक्त मोदीजी  आवडायचे, पण धर्मवीर बघितल्यापासून तुम्हीही आवडू लागले आहेत. तसंच आता तुम्ही रुद्रांशला (शिंदेंचा नातू) त्याला वेळ कसा द्याल? असा प्रश्नही या मुलीने शिंदेंना विचारला. या चिमुरडीने एकनाथ शिंदेंकडे एक गोड हट्टही केला, ज्यामुळे ते अक्षरशः निरुत्तर झाले.

ही मुलगी म्हणाली, मला तुमच्याकडून एक प्रॉमिस हवं होतं, येणाऱ्या दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही मला गुवाहाटीला फिरायला घेऊन जाल? त्यावर एकनाथ शिंदेंना काय उत्तर द्यावं, असा प्रश्न पडला. शेवटी कामाख्या देवीच्या दर्शनाला जायचंय ना, जाऊया, असं म्हणत त्यांनी तिची समजूत काढली.

Post a Comment

0 Comments