सोलापूर! भोंदूबाबा अब्बास बागवान याच्या घरातून अघोरी विद्येच साहित्य हस्तगत



सोलापूर-सांगली जिल्ह्यातील म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येत अटक असलेल्या मांत्रिक अब्बास बागवान याच्या घराची झडती सांगली पोलिसांनी शुक्रवारी दिवसभर केली.मांत्रिक अब्बास बागवान याचे घर सोलापुरातील मुस्लिम पाच्छा पेठ येथील अपार्टमेंट मध्ये आहे.सांगली पोलिसांच्या टिमने संपूर्ण घराची कसून झडती घेतली.यामध्ये यांना काळी विद्या किंवा काळ्या जादूचे साहित्य आढळले.पोलिसांनी सर्व साहित्य हस्तगत केले असून तपासासाठी सांगली येथे घेऊन गेले आहे.गुप्तधनाचे आमिष दाखवून अब्बास बागवान आणि धीरज चंद्रकांत सुरवसे यांनी म्हैसाळ(सांगली-मिरज) येथील व्हनमोरे कुटुंबातील 9 जणांची हत्या केली असा गुन्हा मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाला आहे.दोघां संशयीत आरोपींना 7 जुलै पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

अब्बास बागवान हा अघोरी विद्यात पारंगत होता-
अब्बास महंमदअली बागवान हा अघोरी विद्यात पारंगत होता.ही अघोरी विद्या यशस्वी होण्यासाठी तो अघोरी कृत्ये करत असल्याची माहिती त्याच्या घराशेजारी असलेल्या नागरिकांनी दिली.दर अमावस्या,पौर्णिमेला अब्बास बागवान अघोरी कृत्ये करत होता.याबाबत त्याच्या घरातील इतर सदस्यांना देखील माहिती होती.तसेच सोलापुरातील त्याच्या नातेवाईकांना देखील याच्या अघोरी कृत्यांबद्दल माहिती होती.मंत्र तंत्र पठण करत स्वतःचे विष्टान्न खाणे,इतर पुरुषांसोबत अनैसर्गिक संभोग करणे,इतर पुरुषांचे वीर्य प्राशन करणे असे अनेक घाणेरडे कृत्य करत अघोरी विद्या यशस्वी करत असल्याची माहिती आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी दिली.

गुप्तधनाचे अमिश त्याने सोलापुरात देखील दाखवले होते-
गुप्तधन काढून देतो,कोट्यवधी रुपयांचे गुप्तधन तुमच्या घराच्या जमिनीखाली आहे.त्यासाठी मंत्रतंत्र विद्येच्या सहाय्याने ते काढावे लागेल असे अमिश दाखवुन त्याने सोलापुरातील नागरिकांना फसविले आहे.काही घटनांची पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे तर काही नोंद झाली नाही.2009 साली सोलापुर शहरातील विजापूरवेस येथील  एका प्रसिद्ध व्यवसायिकाला फसविले आणि आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणे  आणि हत्येचा प्रयत्न  असे गुन्हे जेलरोड पोलीस ठाण्यात त्याविरोधात नोंद झाले आहेत.पण सबळ पुराव्या अभावी त्याची निर्दोष मुक्तता देखील झाली आहे.

काळी विद्या करण्याचे साहित्य सांगली पोलिसांनी जप्त केले-
सांगली पोलिसांची टिम शुक्रवारी दिवसभर सोलापुरात तळ ठोकून त्याच्या घराची झडती घेतली.मुळेगाव रोड वरील सरवदे नगर येथील घर,बाशा पेठ येथील अपार्टमेंट येथील फ्लॅट या घरांची झडती घेण्यात आली.त्याठिकाणी पोलिसांना काळी जादू करण्याचे साहित्य,जडिबुटी सारखे अनेक औषध वनस्पती ,लाकडी दांडके आदी साहित्य सांगली पोलिसांनी हस्तगत केले आहे.अटक झाल्या पासून त्याची पत्नी,मुलं गायब झाले आहेत.त्याच्या बाबत अनेक नागरिकांना माहिती असल्याने त्याच्या पासून अनेकांनी लांब राहणे पसंद केले होते.अब्बास बागवान हा काही मोजक्या लोकांच्या संपर्कात होता.शुक्रवारी सांगली पोलीस दलातील पोलीस उपअधीक्षक अशोक वीरकर हे आपल्या टीम सोबत सोलापुरात आले होते.रात्री उशिरापर्यंत मांत्रिक अब्बास बागवान याला सोबत घेऊन त्याच्या घराची झडती घेतली.पंचनामा करून सर्व साहित्य जप्त केले.आणि सोलापुरातील जेलरोड पोलीस ठाणे येथे माहिती देऊन रात्रीच सांगलीच्या दिशेने अब्बासला घेऊन रवाना झाले.

Post a Comment

0 Comments