ऑनलाईन पत्रकारिता विद्यार्थ्यांचा शिवाजी विद्यापीठात स्नेहमेळावा


कोल्हापूर / प्रतिनिधी;

शिवाजी विद्यापीठाच्या पद्मश्री डॉ.  ग. गो. जाधव पत्रकारिता अध्यासनाच्यावतीने सुरू असलेल्या पी.जी. डिप्लोमा इन ऑनलाइन जर्नलिझम अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात झाला. विद्यार्थ्यांनी यावेळी पत्रकारितेशी संबंधित विविध ग्रंथ अध्यासनाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांच्याकडे सुपूर्द केले.
वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी फोटोग्राफी कार्यशाळा, अँकरिंग कार्यशाळा, डिजिटल मीडियावरची विविध व्याख्याने, यासह विविध उपक्रम राबवण्यात आले होते. अभ्यासक्रमाच्या वर्ष समाप्ती निमित्त विद्यार्थ्यांनी निरोप समारंभ कार्यक्रम आयोजित केला होता.सुरुवातीला पद्मश्री डॉ.  ग. गो. जाधव यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत व प्रस्ताविक मतीन शेख यांनी केले. डॉ. शिवाजी जाधव, सुमित कदम, अक्षय दळवी, सुशांत उपाध्ये आदींनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. निकिता बागणे, संजय भोसले, धनंजय देशपांडे, गितेश डकरे, अनुप गवंडी, रोहित जाधव, नेहा जोशी, राजेश कदम, अमृता कोपार्डे, अजय पोवार, ज्योती पाटील, विजय पाटील, सुनंदा सुतार आणि नम्रता वडेर या विद्यार्थ्यांनी विविध कार्यक्रम सादर केले. राजेश कदम यांनी आभार मानले.

Post a Comment

0 Comments