चहाचा घोट ठरला विषाचा प्याला! सांगलीतलं शॉकिंग हत्याकांड

 
सांगलीतील  20 जून रोजी घडलेल्या खळबळजनक घटनेचं रहस्य उलगडलंय. 9 जणांच्या आत्महत्येची शंका व्यक्त केली जात होती. विष देऊन वनमारे बंधूनी आपलं आयुष्य संपवलं, असं सांगितलं जातं होतं. पण या घटनेच्या सात दिवसांतच पोलिसांनी धक्कादायक खुलासा केला.

9 जणांची आत्महत्या नव्हे, तर हत्याच झाली होती, असं पोलीस तपासासून उघड झालं. या धक्कादायक घटनेप्रकरणी पोलिसांनी केलेल्या खुलाशाने काळजाचा थरकाप उडालाय. मांत्रिकाच्या नादापायी वनमाने कुटुंब उद्धव्स्त झाल्याचं समोर आलं. चकीत करणारी बाब म्हणजे मांत्रिकानं या कुटुंबाला चहातून विष दिलं. चहाचे घोटच वनमारे कुटुंबासाठी मृत्यूचं कारण ठरलं.

आत्महत्या नव्हे, हत्याच!
वनमारे कुटुंबाला मांत्रिकाने त्याच्या ड्रायव्हरच्या मदतीने ठार मारलं. चहात विष कालवून या मांत्रिकानं आणि त्याच्या ड्रायव्हरने हे भयानक हत्याकांड रचलं होतं. अब्बास मोहम्मद अली बागवान असं या मंत्रिकाचं नाव आहे. हा मुख्य आरोपी असून त्याच्या ड्रायव्हरचाही या हत्याकांडात हात आहे. या मांत्रिकाच्या ड्रायव्हरचं नाव धीरज चंद्राक सुरवसे आहे.

चहाचा विषारी घोट!
हा मांत्रिक रदस्यमय खजाना शोधण्यासाठी वनमारे कुटुंबाच्या घरात आला होता. यावेळी त्यानं कुटुंबातील सगळ्यांना गच्चीत पाठवलं. त्यानंतर त्यानं एकएकाला खाली बोलावलं. मग त्यांना चहा पिण्यास सांगितलं. चहा पिऊन एक एक जण बेशुद्ध पडला. बेशुद्ध झालेल्या या घरातील प्रत्येक कुटुंबानं त्याच अवस्थेत शेवटचा श्वास घेतला होता.

दोघांना अटक!
पोलिसांनी या हत्याकांडप्रकरणी दोघांना अटक केली आहे. त्यंची कसून चौकशी केली जातेय. 20 जून रोजी वनमारे बंधूंच्या आत्महत्येनं संपूर्ण म्हैसाळ गाव हादरुन गेलं होतं. 9 जणांचे मृतदेह घरात निपचित पडल्याचं समोर आल्यानंतर गावकरी हादरुन गेले होते. याबाबत नंतर पोलिसांनी कळवण्यात आलं होतं. डॉक्टर आणि शिक्षक बंधूंच्या आत्महत्या झाली असल्याचं समजताच संपूर्ण सांगली हादरलेलील. मात्र ही आत्महत्या नसून हत्याच असल्याचं पोलिसांच्या तपासातून उघड झालं आहे.


Post a Comment

0 Comments