वैराग! येमाई तांडा येथे अवैद्य दारू साठा पोलिसांनी केला जप्‍त; पोलिसांना पाहताच दारूसाठा करणाऱ्यांनी ठोकली धूम



मानवी शरीरासाठी अपायकारक असणारी गावठी दारू तालुक्यातील येमाई तांडा येथे वैराग पोलिसांनी जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे की, वैराग पोलिसांना यमाई तांडा येथे अवैधरित्या गावठी दारूची विक्री व साठा होत आहे अशी माहिती मिळाली, ऑपरेशन परिवर्तन अंर्तगत पेट्रोलिंग करत असताना मौजे यमाई तांडा येथे मोठ्या प्रमाणात हातभटटी दारू काढण्याचे काम चालु आहे तसेच हातभट्टी दारू गाळण्याकरीता लागणारे गुळमिश्रीत काळे रसायनाचे बॅरल साठा केलेला आहे अशी बातमी मिळालेने वरील अधिकारी व स्टाफ असे दोन पंचाना रेड कामी बोलावुन घेवुन त्यांना बातमी प्रमाणे हकीकत सांगुन रेडला लागणारे साहित्य घेवुन सरकारी वाहनाने बातमी प्रमाणे मौजे हिंगणी, मळेगांव, जामगांव (पा), भातंबरे मार्गे यमाईतांडा येथे गेलो. त्यानंतर बातमीतील ठिकाणी गेलो असता सदर इसमास आमची चाहुल लागताच तेथुन पळुन गेला. पळुन गेलेल्या इसमाबाबत आजुबाजुच्या लोकांकडे त्याचे नाव गाव विचारले असता त्यानी त्याचे नाव रमेश बाळू राठोड रा.यमाईतांडा ता.बार्शी असे सांगितले.


गावठी हातभटटीची दारू तयार करण्यासाठी लागणारे रसायन मध्ये युरिया, कुजविलेले गुळमिश्रीत रसायन, झाडाच्या साली असे वस्तु मानवी आरोग्यास हानीकारक होईल तसेच ज्यामुळे मानवी आरोग्याचे दुःखापतीस व मृत्युस कारणीभुत होतील अशा वरील मुच्छाकारक, नशाकारक, अपायकारक, तयार होणारी दारू सेवन केल्यामुळे मानवी आरोग्यास हानी पोहचेल अशा वस्तु वापरून त्यापासून होणारे कच्चा रसायना पासुन गावठी दारू तयार करण्याचे उद्देशाने सदर ठिकाणी वरील वर्णानाचे व किंमतीचे रसायन व ह.भ दारू एकुण किंमत 3250/- रू. चा माल जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळुन आले त्याच्यावर भादवि संहिता कलम 328 व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 ई व 65 एफ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments