बार्शी! शासकीय कामात अडथळा आणला म्हणून दोघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल



बार्शी शहरातील रोटरी क्लब सुभाषनगर येथे काही लोक दारू पिऊन आरडाओरडा व अश्लिल शिवीगाळ करत आहेत अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली, त्यानुसार शहर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी करून दोघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधी सविस्तर माहिती अशी की, 10 जून रोजी दुपारी चारच्या सुमारास रोटरी क्लब सुभाष नगर च्या परिसरात दारू पिऊन गोंधळ घालत आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी जाऊन पोलिसांनी त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांना ढकलून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे शासकीय कामात अडथळा आणला रोहित शिंदे व वैभव जाधव दोघेही रा. सुभाष नगर यांच्यावर शासकीय कामात अडथळा आणला म्हणून भादवि कलम ३५३,३३२,३४ कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

0 Comments